Tuesday, 7 April 2020

तू बदलली आहेस

तू बदलली आहेस 

आता तू कॉल माझ्याआधी कट करतेस
आता तू गोष्टी एक्सप्लेन नाही करत
जे आहे ते आहे म्हणत प्रॅक्टिकल वागायला आणि बोलायला लागली आहेस
माझ्या शेवटच्या मेसेजवर प्रत्येकवेळी स्माइली सेंड करायचीस तू,
आता तू किती पण चांगला मेसेज असला तरी ब्लू टिक वर सोडून जातेस...
हजारवेळा सॉरी सॉरी, उगाच थँक्स थँक्यू बोलून डोकं खायची तू कधी, आता हक्काच्या गोष्टी मध्ये आणतेस...
माझ्यातील कमीपणा दाखवायचा समजंत नव्हतं तुला
आता स्वतःत काही कमी नाही असं समजून पुढे निघून जातेस...
हजार मेसेज यायचे तुझे...
माझ्यावर प्रेम आहे...
किती किती ते मेसेज कविता...
आता कामाच्या गोष्टींविषयी बोलून कुठे तरी दुसरीकडे व्यस्त होतेस...
आता.. किती बदलली आहेस तू...

बदलली आहे कारण...
पर्याय नसतात...

कारण...
..............पुन्हा कधीतरी  💝

- सिद्धी बोबडे 

No comments:

Post a Comment