Monday, 13 April 2020

वेळ

आपल्याकडे कारण नसलेल्या वेळेचं

तुझ्याकडे कमी वेळ
माझ्याकडे जास्त वेळ ...

असे करता करता, 
जाणीव बनते वेळ
मन बनते वेळ
बोलत राहते वेळ
शांत राहते वेळ
मौन धरते वेळ..

वेळ आली गेली की 
वेळीच फरक पडावा  
 _उधार घ्यावा माझा वेळ_
_उधार घ्यावा तुझा वेळ_
सरूच नये वेळ 
आपल्यावर आली जर वेळ
जाणवून देईल वेळ
असते काय ती वेळ
अंतरे गेलेली वेळ 
टाकून दे वेळीच

वेळ नसलेल्या माणसा.. 
वेळ तुझ्यासाठी राखून ठेव 
तुझ्यासाठी ठेव वेळ
वेळेचा हा बघ अवघड खेळ

- सिद्धी बोबडे

#NaPoWriMo2020 #NaPoWriMo
#lockdown #LockdownDay19

No comments:

Post a Comment