Wednesday, 15 April 2020

म्हणजे कसं...

म्हणजे कसं...

चांगलं आणि वाईट दोन्ही असावं माणसाने 
म्हणजे कसं रडावं आणि हसावं माणसाने
म्हणजे कसं सुखाचा आणि दुःखाचा दोन्हीचा सामना करावा माणसाने

म्हणजे कसं कोणासाठी तरी चांगलं वागावं माणसाने
म्हणजे कसं तुमचं आमचं नसावं
म्हणजे कसं तुझं माझं नसावं
म्हणजे कसं काळं पांढरं दोन्ही असावं माणसाने
म्हणजे कसं ऊन आणि पाऊस दोन्ही आपले वाटावेत माणसाला

म्हणजे कसं परिस्थितीत योग्य वागता आलं पाहिजे माणसाला
म्हणजे कसं हरणं आणि जिंकणं दोन्ही स्वीकारता यावं माणसांना
म्हणजे कसं आपलं वाटावं सगळ्यांना

म्हणजे कसं तू,मी,एक सूर्य,एक चंद्र,एक तारा,एक पृथ्वी 
आपली स्वप्न वेगळी, ध्येय वेगळी, जिद्द वेगळी,मार्ग वेगळे तरी पण तू मी एकसारखं असावं 

म्हणजे कसं तर मस्त जगावं माणसाने 
म्हणजे कसं छान जगावं माणसाने
म्हणजे कसं तर असं...🖤

#NaPoWriMo2020 #NaPoWriMo 
#Lockdown #LockdownDay21

No comments:

Post a Comment