Sunday, 12 April 2020

हवा हवा ऐ हवा...

हवा हवा ऐ हवा...

ही पकडापकडी जगण्याची  धांदल किलकिल्या स्वप्नांची 
हवं हवं नवं काहीतरी 
पळ पळ पळतो जो तो...

मला हे हवे, त्याला ते हवे
आपण तिसऱ्यालाच हवे 
सगळे सगळ्या हव्यांच्या मागे
एक सोडून दुसरीकडे पळतो जो तो...

एका मागे दुसरे हवेच
आयुष्य कसं मस्त हवं
सगळं कसं छान हवं
स्वप्न कशी मोठी हवी
पण आयुष्यात थोडा कंटाळा हवा
कंटाळून जायचा पण कंटाळा हवा
हवा ऐ हवा...

तू एक फोटो 
टाक त्यावर कंमेंट 
नुसती हवा नुसता धूर
कोण हवा, हा हवा 
शुद्ध होतेय प्रदूषित हवा  
मग काय आता नवीन हवा
 फोटो पोस्ट कर तुझीच हवा
सोशल मीडियावर तुझीच हवा
हवा आता थोडी शुद्ध होतेय 
सुर्या दगड पृथ्वी दगड 
ज्याला जो हवा 
त्याला तिसराचं कोणीतरी हवा
बाकी काय मग भावा?

आता आलीय नवीन हवा
त्याच्या गाडीची जामच हवा
आपल्या मेंदूचा टायर जुना 
तिथेच पंक्चर काढायला हवा
तू हवा, ती हवा, ह्याची हवा, त्याची हवा, तिची हवा 
नुसती हवा 

हवा ऐ हवा...

- सिद्धी बोबडे

#NaPoWriMo2020 #NaPoWriMo
#Lockdown #LockdownDay18

No comments:

Post a Comment