तू सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतेस ना... असं तो कायम म्हणतो...
आताशा इन्स्टग्रामवर फार असते. नाही म्हणजे प्रत्यक्षात भूक, तहान, चिडचिड, सगळं आणि हो कंटाळा सगळं यथासांग सुरू असतं. पण या सगळ्याचे जिवंत पुरावे मी त्याच्याकडे सुपूर्त करते. तो म्हणजे माझा सोशल मीडिया... इथल्या फॉलोअर्स आणि following चा बरोबर ताळ बसवते मी. असाच एकदा मला तू सापडलास खरंतर काही लोकांच्या वाट्याला यश, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी येतात. तसा तू माझ्या वाट्यालाच आलास. मग तुझ्या सोशल मीडियावरच्या पोस्टचा त्यावर लोकांनी केलेल्या कंमेंटचा वेध घेत...आपण बोलत तर होतो आधी पण अचानक एकदा रीतसर सुरवात केली.मग आपल्यातल्या सारख्या गोष्टींची यादी पण करून झाली मनात बरं का. खरंतर सोशल मीडिया माझ्यासाठी कितीही नेहमीचं असलं तरी आपल्याला प्रत्यक्षात बोलणं गरजेचं होतं.
माझ्या डोळ्यात आणि मनात असलेलं तुझं व्हर्च्युअल असणं आता प्रत्यक्षात जाणून घेणं गरजेचं होतं.
आता साधंच बघ ना 'पौर्णिमेच्या दिवशी कितीही लोकांच्या स्टोरी मध्ये चंद्र दिसत असला तरी आपल्याला त्याच्या सोबत वन तू वन डेट हवीच असते ना. प्रत्यक्षात...'
पण मी खूप कमी बोलते अरे... म्हणजे मला बडबड करता येते
पण संवादाची सुरवात करण्यात मी नेहमीच गच खाते.
आपण टिपिकल सुरवात करू शकतो का...
किंवा मी सरळ सांगते तुला मला तुझ्याशी बोलायचं आहे...
आपण कितीदा बोललो कित्येक विषयावर बोललो...
किती राडा घातला होत
ा मी लहान लहान गोष्टींचा माझ्या डोक्यात
आणि तू मला माझ्या डोक्यातल्या विचाराच्या जंजाळातून एकदम अलगद बाहेर काढलंस
काय करत होतीस तू इतके दिवस...वगैरे वगैरे
तर
आताशा माझ्या गांगरलेल्या स्वभावाला एक किनारा मिळाला आहे.
#किनारा
- सिद्धी 💝