Saturday, 7 April 2018

आपण मोठे नाही होत

आपण मोठे नाही होत,
फक्त हट्ट करणं थोडं कमी करतो.
आपण मोठे नाही होत,
बस आपण तक्रारी करणं कमी करतो.
आपण मोठे नाही होत,
फक्त आपल्याला सोप्या मार्गाचे दुष्परिणाम समजायला लागतात.
आपण मोठे नाही होत,
फक्त पैशाचं महत्त्व समजून, आपण त्याची किमंत करायला लागतो.
आपण मोठे नाही होत,
पण ते काम करायला पण शिकतो जे की ते आपल्याला कधीच आवडत नसतं.
आपण मोठे नाही होत,
बस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या मेहनतीची कदर कळू लागते.
आपण मोठे नाही होत,
फक्त आपण हे समजतो की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते.
आपण मोठे नाही होत,
फक्त चुकीच्या गोष्टीची आपल्याला आपसूकच जाणीव होऊ लागते.
आपण मोठे नाही होत
फक्त आपल्याला समजायला लागतं की,
अचानक जवळ आलेल्या व्यक्ती आणि पटकन मिळालेल्या गोष्टी
ह्या तितक्याच चटकन लांब जाणार आहेत.
आपण मोठे नाही होत,
फक्त आपल्याला हे समजायला लागतं की व्यक्ती ही कायम आहे, ती तशीच नसणार आहे.
आपण मोठे होत नाही,
फक्त आपल्याला चुकीच्या वाटणाऱ्या व्यक्तीच्याही काही मजबुरी असतील हे कळू लागते.
आपण मोठे होत नाही,
फक्त आपल्यातील ‘मी पणा’ छोटा होत असतो,
आपण मोठे नाही होत...पण दुनियादारी आपल्याला खूप काही शिकवून जात असते..

- सिद्धी बोबडे

No comments:

Post a Comment