"अजून आठवण येते?"
"सुरुवातीला यायची, आता नाही येत."
असं कसं होऊ शकतं?"
असं कसं होऊ शकतं?"
"असंच होत जातं, सब्स्टीट्यूट आहेत या दुनियेत, सगळ्यांकडे सगळ्याचे."
"नाही, असं नाही होत, झोपेतून अचानक जाग येते. झोप तुटते...अपूर्ण राहते... विचारामध्ये तासनतास निघून जातात, जेवताना जेवनाकडे लक्ष लागत नाही, वाचायला घेतलेलं अर्धवट राहतं... लिहायला घेतलं तर अर्धवट राहतं... काही सुचतचं नसतं... कोणत्याच कामात लक्ष लागत नाही.आभाळ पाहता पाहता अश्रु घरंगळु लागतात.
मित्र मैत्रिणी बरोबर गप्पांमध्ये पण लक्ष लागत नाही.. दोस्तों से झूटी मुठी दुसरों का नाम लेके, फिर तेरी बातें करना...असं काही तरी घडत असतं... प्रत्येक दुसऱ्या विषयात तोच विषय शोधत राहतो."
मित्र मैत्रिणी बरोबर गप्पांमध्ये पण लक्ष लागत नाही.. दोस्तों से झूटी मुठी दुसरों का नाम लेके, फिर तेरी बातें करना...असं काही तरी घडत असतं... प्रत्येक दुसऱ्या विषयात तोच विषय शोधत राहतो."
"हे सगळं तर होतंच असतं पण
उत्तर हेच द्यायचं असतं की, आता आठवण नाही येत...."
उत्तर हेच द्यायचं असतं की, आता आठवण नाही येत...."
- सिद्धी बोबडे
No comments:
Post a Comment